अमळनेर : नगरपालिकेत गेल्या दोन महिन्यांपासून सेवानिवृत्तीधारकांना महिन्याच्या १ तारखेला नियमित निवृत्तीवेतन अदा करण्यात येत आहे. यासोबतच सफाई कामगार आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे वेतनही दरमहा १ ते ५ तारखेदरम्यान थेट खात्यात जमा होत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. या सकारात्मक निर्णयाबद्दल कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी नुकतीच मुख्याधिकारी यांच्या दालनात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक आभार मानले.

