पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्याकरिता ३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.विलंब शुल्कासह हे अर्ज सादर करावे लागणार आहेत.याआधी, विद्यार्थ्यांनी २० ऑक्टोबरच्या आत परीक्षांचे अर्ज भरावयाचे होते.

