अमळनेर येथील दगडी सबगव्हान चे माजी लोकनियुक्त सरपंच सौ. संगीता नंदलाल पाटील व सामाजिक कार्यकर्ता श्री नंदलाल पाटील यांनी गावात केलेले विकास कामांची दखल घेत अखिल भारतीय सरपंच परिषदेने मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष मंत्रालय मुंबई चे मंगेशजी चिवटे यांच्या हस्ते ग्रामरत्न सरपंच पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला व अखिल भारतीय सरपंच परिषद चे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी देखील दगडी सबगव्हाण गावाचे कौतुक केले. हा पुरस्कार सोहळा लोणावळा येथे पार पडला. नंदलाल पाटील यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

