अमळनेर तालुक्यातील मौजे मूडी, बोदर्डे बाम्हणे ग्रामस्थानी दोन वाळू तस्करांना पकडून महसूल कर्मचाऱ्यांना दिले ताब्यात.
सविस्तर वृत्त की, तालुक्यातील पांजरा, तापी सह बोहरी नदीतून महसूलच्या नाकावर टिचून बिनधास्त पणे वाळू तस्करी होत असल्याचे माहीती करडी नजर ने प्रकाशीत केली होती व त्यात इशारा ही देण्यात आला होता की, महसूल विभागाने वाळू तस्करांवर कारवाई नाही केली तर लोक रस्त्यावर उतरतील व तुमची पळता भुई थोडी होईल.तालुक्यातील नागरिक या वाळू तस्करीला कंटाळाले आहे. एखाद्याचा जीव ही जाऊ शकतो. ट्रॅक्टर अंगावर घेऊन जाण्या इतपत वाळू तस्करांची हिम्मत वाढली आहे.याचा राग नागरिकांच्या मनात उसळत होता.त्याचा प्रत्यय तालुक्यातील मूडी, बोदर्डे बाम्हणे येथे ग्रामस्थांनी वाळूची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडुन पोलीस व महसूल विभागाला बोलवून ताब्यात दिले.हे दोन्ही ट्रॅक्टर महसूल विभागाने वाळूसह (गौण खनिज) जप्त करून पुढील कारवाईसाठी अमळनेर येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.सदरचे दोन्ही ट्रॅक्टर बेटावद येथिल मालकाचे असल्याचे कळतं.
तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी, अवैध गौण खनिज वाहतुकीवर कठोर कारवाई सुरू ठेवणार असल्याचे मनोदय व्यक्त केला आहे.
अमळनेर प्रतिनिधी,तालुक्यातील मुख्यमंत्री युवाकार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी नियमित सेवेत घेण्याची मागणी करत प्रशासनासह लोकप्रतिनिधींना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे. अमळनेर…