अमळनेर:- येथील सामाजिक कार्यकर्ते हृदयनाथ मोरे यांना भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली यांच्यामार्फत दिला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप पुरस्कार २०२५ नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
फुले, शाहू, आंबेडकर, बहुजन विचारधारेच्या प्रचार आणि प्रसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये करणाऱ्या समाजसेवकांना हा पुरस्कार देण्यात येतो. जळगाव जिल्ह्यातून ही निवड करण्यात आली आहे.
हा पुरस्कार मिळाल्याबद्दल हृदयनाथ मोरे यांचे समाजातील विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
एरंडोल येथील रहिवासी व वावडदा तालुका जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे दिनेश…