माजी आ. साहेबराव पाटीलांनी पडद्या मागून मदत केल्याने जाहीर आभार – माजी आमदार शिरीष चौधरी

अमळनेर : मा. आमदार शिरीष चौधरी यांनी येत्या १ तारखेला अमळनेर नगरपालिकेत पदग्रहण करण्याच्या पारश्वभूमीवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत माजी आ. साहेबराव पाटील यांचे मानले आभार.

सविस्तर वृत्त की, अमळनेर न पाच्या निवडणुक निकाला नंतर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्याने अपक्ष उमेदवारांचा भाव वाढला आहे. अपक्ष उमेदवार यांनी पाठींबा द्यावा म्हणून आजी – माजी आमदारांनी आपले राजकीय डावपेच आखत अपक्ष उमेदवार आपल्या कडे कसे येतील, यावर आपली ताकद लावली होती मात्र यात माजी आमदार शिरीष चौधरी यांनी नगरविकास मंत्री तथा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्ड चालवत जवळपास बारा अपक्ष उमेदवार आपल्या जाळ्यात अडकविले व सत्तेत सहभागी करून घेतले.

    अमळनेरच्या राजकीय घडामोडींवर स्पष्ट भूमिका मांडतानां चौधरी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की,“आमिष दाखवून नव्हे, तर लोकांना अपेक्षित असलेले अमळनेर घडवायचे आहे. पुढे ते म्हणाले की, परवा दोन गटांची स्थापना करण्यात आली असून, या दोन गटांमुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या एकाने वाढली आहे. सत्तेतील प्रत्येक समाज घटकाला एक-एक वर्ष कोअप मध्ये नगरसेवक पदी संधी देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.नगरपालिकेत शिवसेना व शहर विकास आघाडीत युती झाली असल्याच्या चर्चांना त्यांनी अफवा ठरवत फेटाळले. “युती झाली ही केवळ अफवा असून, उपनगराध्यक्ष पद आमच्याचकडे आहे,असे त्यांनी ठणकावून सांगितले.

राजकीय टीका करताना माजी आमदार चौधरी म्हणाले, “आमदार अनिल पाटील यांनी नंदुरबारमध्ये आमचा पाटा पाडणार म्हणून भाषणात वक्तव्य केले होते मात्र ते ज्या पक्षाचे आहे त्या पक्षाचा एकही नगरसेवक नंदुरबार मध्ये निवडून आला नाही. मात्र अमळनेर च्या मतदारांनी त्यांचाच पाटा पाडला आहे.मंत्रीपद भोगलेल्या व्यक्तीच्या अर्धागणीला अतिशय कमी मत पडणे ही बाब लाजिरवाणी आहे.”तसेच पारोळा येथील आमदारांनी ‘चाटमाऱ्या’ नावाबाबत केलेले विधान आज खरे ठरले असल्याचेही त्यांनी नमूद केले.त्यांनी पुढे सांगितले की येत्या 1 जानेवारीला सर्व सामान्य जनतेच्या उपस्थितीत पदग्रहण सोहळा पार पडणार आहे. शेवटी त्यांनी सांगितले की, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी आम्हाला पडद्या मागून मदत केल्याने त्यांचे जाहीर आभार मानतो.

  याप्रसंगी शिवसेनेच्या नेत्या ऍड ललिता पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर, गट नेते पंकज चौधरी, अपक्ष गट नेते महेश देशमुख, प्रवक्ते नाविद शेख सह शिवसेनेचे नवनिर्वाचित नगरसेवक व सहयोगी अपक्ष नगरसेवक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!