अमळनेर येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीत मतदारांनी त्रिशंकू कल दिल्याने स्थानिक राजकीय पटलावर नेत्यांची सत्ता स्थापनेत मोठी गोची करून ठेवल्याने खळबळ उडाली असल्याचे बोलले जात आहे.
सविस्तर वृत्त की, तब्बल नऊ वर्षा नंतर अमळनेर नगरपरिषदेची निवडणूक लागल्याने अनेकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत आमदार अनिल पाटील यांनी स्थापन केलेल्या शहर विकास आघाडी कडे संधी साठी गुहार लावली होती.आमदार अनिल पाटील हे दुसऱ्यांदा निवडून आल्याने मतदार संघात त्यांचे प्राबल्य वाढले असल्याने व सत्तेत मंत्री पद भोगल्याने व भविष्यात पुन्हा मंत्रीपद मिळणार असल्याच्या चर्चेने अनेकांनी उमेदवारी मागितली होती.दुसरी कडे युतीतील भाजपा मधील ही अनेक जन उमेदवारी मिळावी म्हणून पाण्यात देव सोडून होते.शहर विकास आघाडीवर आमदार अनिल पाटील यांची पकड असल्याने तिकीट वाटपात भाजपाला सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाही. उलटपक्षी भाजपाच्या वाटेला आलेल्या तीन इच्छुकांना स्वतःच्या पक्ष चिन्हावर नलढता आघाडीच्या चिन्हावर लढावे लागले.त्यामुळे तिकीट नमिळालेल्या इच्छुकांनी आघाडी विरोधात अपक्ष उमेदवारी केली.
दुसरीकडे माजी आमदार शिरीष चौधरी यांनी प्रवेश केलेल्या शिवसेने कडे संधी मागण्याचा कल काहीसा कमी दिसून आला होता.मात्र शिरीष चौधरी यांनी आपली राजकीय परिपक्कंवता दाखवत काही ठिकाणी पुरस्कृत उमेदवारांना जाहीर पाठींबा दिला होता.त्यापैकी अनेक उमेदवार निवडून आले आहे.त्यामुळे त्यांच्या बाजूने शिवसेनेचे दहा व पुरस्कृत दोन असे बारा उमेदवार हक्काचे आहेत.
मतदारांनी यावेळी मात्र कोणा एकाकडे सत्तेची चावी नदेता त्रिशंकू स्थिती निर्माण केली. यात तब्बल बारा अपक्ष उमेदावारांना कल दिला.यामुळे सत्ता स्थापने साठी अपक्ष उमेदवारांची भूमिका अहम ठरणार आहे. निकाला नंतर सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.शहर विकास आघाडी व शिवसेनेला संख्याबल जुळवा जुळव करण्यात अपक्ष उमेदवारांची झालेली एकी मोठी डोकेदुखी ठरू शकते.
अपक्ष उमेदवारचा एक स्वतंत्र गट स्थापन झाल्याने त्यांच्या मागणीला महत्व प्राप्त झाले आहे. सदर गटाने उप नगराध्यक्ष पद व दोन ते तीन सभापती पदाची मागणी ठेवल्याची खात्रीशीर समजले आहे.
अपक्षा शिवाय सत्ता स्थापन करण्यासाठी राज्यात युतीत असल्याने शहर विकास आघाडी व शिवसेना एकत्रित येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र ही चर्चा अपक्ष उमेदवारांना घाबरविण्यासाठीच असल्याचे सुज्ञाचे मत आहे. या पारश्वभूमीवर एका अपक्ष उमेदवाराने मत मांडताना सांगितले की, आमदार अनिल पाटील यांची शहर विकास आघाडी व शिवसेनेला विरोध दर्शवीत आम्हाला कल दिला आहे.निवडणुकी या दोघांनी एकमेका विरोधात टोकाची भूमिका घेतलेली होती आणि आत्ता निव्वळ सत्तेच्या स्वार्था साठी हे दोघे एकत्र येत असतील तर आम्ही जनते समोर जाऊन यांच्या विरोधात जनमत तयार करू. याचा परिणाम येणाऱ्या जिप व पस च्या निवडणुकीवर झाल्या शिवाय राहणार नाही.आम्ही अपक्ष या दोघांच्या विरोधात दंड थोपटून उभे राहू. याची त्यांनी दखल घ्यावी.
या सर्व बाबीचा विचार केला असता सत्तेत राहण्यासाठी अपक्षानां सोबत घेतल्या शिवाय पर्याय शिल्लक राहिलेला नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र येत्या काळात राजकीय बदल काय घडतात याकडे पाहणे उत्सुक्तेचे ठरेल.
अमळनेर प्रतिनिधी,येथील महाविकास आघाडीचे तथा काँग्रेसचे उमेदवार डॉ अनिल नथ्थू शिंदे यांच्या प्रचारर्थ जाहीर सभेत सानेगुरुजी हायस्कूलच्या पटांगणात सुप्रसिद्ध अभिनेते…