कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार अनिल पाटील यांच्या विजयाने पेढे वाटप…

 

अमळने येथील विधानसभा निवडणुकित युतीचे तसेच अजित पवार राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे ना.अनिल भाईदास पाटील यांनी विक्रमी मत मिळवून दणदणीत विजय मिळविल्याबद्दल अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक आधार पाटील यांनी विजयोत्सव साजरा केला.

अमळनेर विधानसभा निवडणुकीत तिरंगी लढत रंगली होती मात्र प्रत्यक्षात सदर लढत आमदार अनिल पाटील व अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांच्यातच झाल्याचे चित्र समोर आले. या दुरंगी लढतीत मंत्री अनिल पाटील यांनी विक्रमी मत मिळवून विजयी झाले. अमळनेरकरांनी नवा इतिहास घडवला. यामुळे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी उपस्थित शेतकरी,व्यापारी, हमाल, मापार्डी तसेच बाजार समितीच्या अधिकारी यांच्या समवेत सर्वाना पेढ़े भरवून आनंद साजरा केला.

बाजार समितीतील व्यापारी संघटना, हमाल – मापाडी संघटना,कर्मचारी संघटना यांनी निवडणुकीत अनिल पाटील यांना आधीच पाठिंबा दिलेला होता.मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी १० वर्ष कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पद भूषविले असून, बाजार समितीच्या प्रत्येक घटकाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. बाजार समितीत विजयोत्सव साजरा करतांना
संचालक समाधान धनगर, वृषभ पारख,विजयपाटील तसेच व्यापारी,शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!