अमळनेर नगराध्यक्ष पदासाठी डॉ. परीक्षित बाविस्कर आणि जितेंद्र ठाकूर यांच्यात चुरशीची लढत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
जितेंद्र ठाकूर हे शहरातील सुपरिचित पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यांनी अमळनेर नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी शहर विकास आघाडी च्या माध्यमातून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
दुसरीकडे डॉ. परीक्षित बाविस्कर यांनीं ही शिंदेच्या शिवसेनेतुन नगराध्यक्ष पदासाठी जनते समोर प्रभाविपणे जात आहे.
आघाडीचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या पार्श्वभूमीवर नजर टाकली असता, ते गेल्या कित्येक वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून शहरातील सामान्य नागरिकांच्या समस्यांवर प्रकाश टाकत आहेत. त्यांच्या सडेतोड आणि निर्भीड पत्रकारितेमुळे त्यांनी जनमानसात ओळख निर्माण केली आहे.शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून ही ते पत्रकारितेच्या माध्यमातून पीडितांचा आवाज बनून खंबीर पणे न्यायाची लढत आहे. या खंभीर वृतीचा फायदा शहरातील नागरिकांना सुख सुविधा मिळाव्या म्हणून राजकारणाचा त्यांनी मार्ग स्वीकारल्याची चर्चा सर्वत्र एकायला मिळत आहे. त्यांच्या विजयाची शास्वती म्हणजे ते स्थानिक असल्याचे बोलले जाते. चांगले काम करणाऱ्या व्यक्तींना बदनामीच्या कसोटीतून जावेच लागतं,मात्र अश्या बदनामीला भीक घालत नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी करडी नजर न्यूज ला दिली आहे.
शिंदे शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ परीक्षित बाविस्कर हें उच्च शिक्षित असून ते वैद्यकीय क्षेत्रात त्यांची भरीव कामगिरी आहे. त्यांनी आपल्या वैद्यकीय सेवेत समाजातील अनेक वंचीत घटकांना आरोग्य शिबिरातून मोफत सेवा पुरविली आहे. अमळनेर च्या नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून अत्याधुनिक आरोग्य सेवा केंद्र उभारण्याचा त्यांचा मानस आहे.ते मूळचे अमळनेर येथील असल्याने त्यांना शहरातील समस्याची पूर्ती जान असल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष निवडून आल्यास राज्याचे नगरविकास मंत्री तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्फत समस्या मुक्त शहर बनविण्याचा मानस त्यांनी करडी नजर न्यूज सोबत बोलतांना व्यक्त केला आहे.
नगराध्यक्ष पदासाठीची चुरशीची लढत पाहता, अमळनेरच्या मतदारांना योग्य उमेदवार निवडण्याचे आव्हान करडी नजर न्यूज करत आहे.