अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत विठ्ठल–रुक्मिणींच्या दर्शनाने प्रभाग १२ मध्ये सुयोग धनगरांच्या प्रचाराचा दमदार शुभारंभ

 

     अमळनेर नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक १२ मधून शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार नाना धनगर यांचे सुपुत्र सुयोग नाना धनगर यांच्या प्रचार मोहिमेचा भव्य शुभारंभ आज अभूतपूर्व जनसमुदायाच्या उपस्थितीत पार पडला.

वाडी संस्थान येथील विठ्ठल–रुक्मिणी मंदिरात विशेष पूजा व नारळ फोडून प्रचार मोहिमेला धार्मिक व पारंपरिक अधिष्ठान देण्यात आले.

        या ऐतिहासिक शुभारंभाला शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार शिरीष चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा अधिकृत श्रीगणेश झाला. सभोवताल जल्लोषी घोषणांनी प्रभाग दुमदुमला —

“शिवसेना बलवान – विकासाभिमुख धनगर जवान!”

सुयोग धनगर हें करडी नजर न्यूज सोबत बोलताना सांगितले की,“तरुणाईचा जोश आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन प्रभाग १२ ला सर्वांगीण विकासाच्या नव्या उंचीवर नेण्याचा माझा निर्धार आहे.”

      प्रचार प्रारंभानंतर नागरिकांशी संवाद साधत त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व शिक्षण क्षेत्रात ठोस आणि दीर्घकालीन नियोजन राबविण्याचे आश्वासन दिले.

     प्रभाग १२ मध्ये सुयोग धनगरांच्या प्रचाराची अशी दमदार सुरुवात झाल्याने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून विजयी समीकरण आता दृढ होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!