अमळनेर : नगरपरिषद निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 2 (अनुसूचित जाती राखीव) मध्ये राजकीय समीकरणे रंगू लागली असून शहर विकास आघाडीकडून देवेंद्र भानुदास कांबळे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
प्रताप कॉलेजचे विद्यार्थी जीवनापासूनच सामाजिक कामाची आवड जपणारे देवेंद्र कांबळे यांनी गेल्या काही वर्षांत समाजातील वंचित घटक, शैक्षणिक उपक्रम, तसेच युवकांच्या समस्यांवर सक्रियपणे काम करून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याविषयी विश्वास निर्माण झाला आहे.
कांबळे यांनी उमेदवारी निश्चित झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना सांगितले —
“प्रभाग 2 मधील प्रत्येक नागरिकाच्या घरापर्यंत विकास पोहोचवणे हेच माझे प्रथम ध्येय आहे. शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्त्यांची उभारणी आणि युवकांसाठी रोजगारपर उपक्रम — यांवर प्राधान्याने काम करणार आहे.”
स्थानिक राजकीय वातावरणात आता प्रभाग क्रमांक 2 मध्ये कांबळे यांचा विकासाचा मुद्दा आणि सामाजिक कार्याचा वारसा हा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे. आगामी दिवसांत प्रचाराची गती आणखी वाढेल, अशी माहिती पक्षाकडून देण्यात आली आहे.
जळगाव,विधानसभा घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत कोणताही राजकीयपक्ष, निवडणूक उमेदवार,इतर कोणतीही संस्था किवा व्यक्ती यानी मतदानाच्या एक दिवस आधी आणि मतदानाच्या…