अमळनेर : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये प्रभाग क्रमांक ४ ब (सर्वसाधारण) मधून शेख नविद अहमद मुशीरोद्दीन यांनी दिनांक १५ नोव्हेंबर २०२५, शनिवार रोजी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केला.
नाविद शेख यांनी आपला नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी सुरुवात धार येथील हजरत अब्दुल रज्जाक शाह बाबा, बालेमिया बाबा, शाहनुरशा बाबा आणि मस्तान शाह बाबा यांच्या दर्ग्यावर चादर चढवून करण्यात आली. धार्मिक स्थळाला दिलेल्या भेटीनंतर मिरवणूक अंदरपुरा, फरशी रोड, कोष्टी वाडा,गांधलीपुरा, पांच कंदिल, सुभाष चौक मार्गे पुढे सरकली.
मिरवणुकीदरम्यान शेख नविद यांनी गरीब नवाज स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण केला. त्याचबरोबर आदिवासी समाजातील क्रांतिकारक शमशेर सिंह यांच्या स्मारकालाही पुष्पहार अर्पण करण्यात आले
यानंतर जयजयकारात आणि डफ-ताशांच्या गजरात मिरवणूक नगरपरिषद कार्यालयात दाखल झाली. तेथे शेख नविद अहमद मुशीरोद्दीन यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे औपचारिकरित्या उमेदवारी अर्ज सादर केला.
या संपूर्ण मिरवणुकीत जेष्ठ नागरिक, आणि तरुण कार्यकर्त्यांची शेकडोंची उपस्थिती पाहायला मिळाली. प्रभागातील नागरिकांनी दाखवलेल्या उत्साहामुळे निवडणूक वातावरणाला विशेष रंग प्राप्त झाला आहे.
शहरात सर्वत्र शेख नविद यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाची चर्चा असून समर्थकांकडून आगामी निवडणुकीत मोठ्या विजयाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत…
अमळनेर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे सर्व सफाई कामगार, कार्यालयीन अधिकारी व…