अमळनेर: शहरात अजून मोठ्या प्रमाणावर विकासकामे व्हावीत, शहरात सामंजस्य, शांतता व एकी टिकून राहावी. स्वच्छ, समृद्ध व सुरक्षित शहर म्हणून अमळनेर उदयास यावे यासाठी मन्सूरी पिंजारी समाज पूर्ण सहकार्य करण्यास तयार झाला आहे. त्यामुळे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर यांच्या सह नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांना मन्सूरी पिंजारी समाजाचे पूर्ण पाठिंबा असल्याचे या समर्थन पत्रात नमूद केले आहे.

