अमळनेर : नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमळनेर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.समीकरणे बदलताना दिसत आहेत.
विधानसभेत परस्परां विरोधात टिकेची तोप डागणारे आमदार अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी पुन्हा एकदा एकमेकांना शह देण्यासाठी मैदानात उतरलेली आहे.विशेष बाब म्हणजे महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट व एकनाथ शिंदे ची शिवसेना राज्याच्या सत्तेत सहभागी असली तरी अमळनेर नगरपरिषदेच्या निवडणुकीत विरोधात असल्याने मोठी लढत यां ठिकाणी बघायला मिळणार आहे.
राष्ट्रवादी पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा ओघ जास्त असल्याने आमदार अनिल पाटील यांच्या समोर बंडखोरीचे मोठे आवाहन ठाकले आहे. तिकीट नमिळाल्यास पक्षांतर्गत नाराजी आणि सत्ता मिळवण्याची धडपड यामुळे स्थानिक राजकारणाला वेगळेच वळण मिळाले आहे.शहर विकास आघाडी चे तिकीट नमिळाल्यास अपक्ष उमेदवारी करण्याची तयारी अनेकांची दिसून येत आहे. याचा फटका शहर विकास आगाडीला बसणार आहे.
शहर विकास आघाडी ही आमदार अनिल पाटील यांच्या नेतृत्वात नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांच्या एकूण ३६ जागांवर दमदार लढत देण्याची रणनीती आखत आहे.
दुसरी कडे माजी आमदार शिरीष चौधरी यांचा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत नुकताच प्रवेश झाल्याने मागील निवडणुकीत त्यांच्या नावाने असलेल्या शिरीष दादा चौधरी मित्र परिवार आघाडी यंदा शिवसेनेत विलीन झाल्याचे चित्र दिसते.विधानसभेच्या निकालात शहरात माजी आमदार शिरीष चौधरी हे फक्त अकराशे मतानी पिच्छाडीवर होते मात्र त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांची ताकद वाढलेली दिसून येते.मा आमदार शिरीष चौधरी हे विविध राजकीय पक्षांतील नाराज बंडखोर तसेच पक्षातील स्वयंभू उमेदवारानां एकत्र आणून ३६ नगरसेवक निवडून आणण्यासाठी स्वतंत्र ताकद सिद्ध करण्याच्या तयारीला लागले आहे.
सत्तेतीलच दोन पक्ष एकमेकांच्या समोर आल्याने मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकतील हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. किंवा मतदार राजा दोघांचे भांडण तिसऱ्याला लाभ असे तर होणार नाही नां..?