अमळनेर न पा निवडणुकीत भाजपा स्वतंत्र लढण्याच्या तयारीत…..?

अमळनेर नगरपालिका निवडणुकीत भाजपाचा “एकला चलो” नारा जोरदारपणे ऐकू येत आहे. महायुतीमध्ये असतानाही भाजपाने स्वतंत्र भूमिका घेत स्वबळावर निवडणुकीत उतरण्याच्या तयारी सुरु केल्याचे खात्रीशीर समजते.ज्यामुळे शिवसेना-राष्ट्रवादी -भाजप संघर्ष टोकाला गेला आहे.

       राज्यात युती असलीतरी अमळनेर न पाच्या निवडणुकीत आमदार अनिल पाटील यांच्या शहर विकास आघाडीत भाजपाला योग्य प्रमाणात जागा नमिळाल्याने कार्यकर्त्यांनी एकला चलो चा नारा देत आपली ताकद दाखवून देण्याचा मानस वरिष्ठा कडे व्यक्त केल्याचे कळतं. आघाडीत निव्वळ सहा ते सात जागाच भाजपाला मिळणार असल्याने कार्यकर्ते नाराज झाले असून तीव्र मतभेद निर्माण झाल्याचे समजते.

   भाजपाच्या एकला चलोच्या नाराचा परिणाम शिवसेना-भाजप – राष्ट्रवादी संघर्ष होय. स्थानिक पातळीवर महायुतीमध्ये तणाव निर्माण झाला आहे.त्याचा परिणाम येत्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

     नगरपालिका निवडणुकीत त्रिकोणीय लढत होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.भाजपाचे स्थानिक खासदार स्मिताताई वाघ व पक्षाचे वरिष्ठ नेते गिरीश महाजन काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!