अमळनेर प्रतिनिधी, विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार अनिल भाईंदास पाटील व खासदार स्मिता वाघ या दोघांनी प्रचारार्थ भेट पदयात्रा काढत लहान मोठे व्यावसायिक व व्यापारी बांधवांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी सर्वानीच विजयी भव च्या शुभेच्छा व आशीर्वाद मंत्री पाटील यांना दिलेत.
लक्ष्मी पूजनाच्या दिवशीं सकाळीच पाच पावली देवी मंदिरात सर्व भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना महायुती चे कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक सर्व एकत्रित आल्यानंतर तेथून वाजत गाजत अनिल पाटील व स्मिता वाघ यांचा जयघोष करीत पदयात्रेस सुरूवात झाली.

यावेळी दोघांनी प्रत्येक व्यापारी बांधवांच्या दुकानात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वच व्यापारी बांधव बाजारपेठत झालेले नवीन रस्ते यामुळे व्यापारी व ग्राहकांची झालेली सोय, शहरात सर्वत्र झालेले रस्ते व विकास कामे, या बाबींचा आवर्जून उल्लेख करत आम्ही अनिल पाटील यांनाच पुन्हा आमदार म्हणून पाहू इच्छितो यामुळे मतदान तर त्यांनाच करू असे सांगताना दिसत होते. शहरासाठी मंजूर झालेली दररोज पाणी देणारी 200 कोटींची नवीन पाणीपुरवठा योजना देखील शहराच्या अर्थकरणास चालना देणारी ठरेल असेही काहींनी सांगितले. याशिवाय व्यापारी बांधव महायुतीच्याच पाठीशी असल्याचे काही व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींनी सांगितले. यावेळी शिवाजी मार्केट, बाजारपेठ परिसर, भागवत रोड, मारवाडी गल्ली, स्टेशन रॉड, सुभाष चौक परिसर, कुंटे रोड, दाणा बाजार, सराफ बाजार आदी परिसरातुन ही पदयात्रा काढण्यात आली. काही व्यापारी देखील स्वयंस्फूर्तीने यात सहभागी झाले होते. एकंदरीत आपुलकीचा भाव या पद यात्रेतून व्यावसायिक व व्यापारी बांधवाना दिसून आला. दुपार पर्यंत ही पदयात्रा सुरूच होती, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा अतिशय मोठा ताफा आणि उत्साह असल्याने या पद यात्रेने संपूर्ण बाजार पेठेचे लक्ष वेधले होते. यात महायुतीचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माजी नगरसेवक सहभागी झाले होते.
