अमळनेर मधील भावी नगराध्यक्षाच्या समोर अमळनेरकरांच्या अपेक्षांचे मोठे ओझे असणार आहे.
नगरपरिषदेच्या तब्ब्ल ९ वर्षा नंतर होऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. या ऐतिहासिक निवडणुकीकडे नागरिकांचे तसेच राजकीय गटासह सर्वांचेच लक्ष लागले असून मतदारांमध्ये प्रचंड उत्सुकता दिसून येत आहे.
नऊ वर्षा नंतर होत असलेल्या यां निवडणुकीत प्रत्येक राजकीय गटात उमेदवारी साठी हालचालींना वेग आला आहे. उमेदवारी मिळवण्यासाठी स्थानिक नेत्यां साकडे घातले जात आहे. प्रचाराची तयारी ही जमात सुरु आहे.मात्र दुसरीकडे मतदार आपल्या नगरध्यक्षकाडून ठोस आणि दिसणारी कामगिरी होण्याची अपेक्षा बाळगून आहेत.
*नागरिकांच्या अपेक्षाचा बोजा..*
नागरिकांच्या भावना जाणून घेतले असता यावेळी अनियमित पाणीपुरवठा,रस्त्याची झालेली दुरावस्था,आरोग्य सुविधा, शिक्षण व्यवस्था,सामाजिक सुरक्षा आणि पर्यावरण संवर्धन या गोष्टींकडे नागरिकांनी विशेष भर दिला आहे.या सर्व क्षेत्रातील बदल आणि विकासाची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे अमळनेर च्या भावी नगराध्यक्षवर नागरिकांच्या अपेक्षेचे मोठे ओझे आहे. त्या अपेक्षा प्रत्यक्षात कितपत पूर्ण होतात आणि नगर परिषदेची दिशा नेमकी कोणती ठरणार याकडे आता लक्ष लागले आहे.
*राजकीय स्पर्धकांना वेग. ….*
विविध राजकीय पक्षाचे स्थानिक पदाधिकारी प्रचारासाठी रणनीती आखत आहेत.तब्ब्ल नऊ वर्षा नंतर होत असलेल्या नगरपरिषद निवडणूकीत कोणता गट आपला ठसा उमटवतो आणि नागरिकांच्या अपेक्षची पूर्तता करण्यासाठी कोणते पाऊल उचलतो हे पाहणे आता उत्सुकतेचे ठरणार आहे.
अमळनेर:- येथील नगरपरिषद निवडणुकीत शहर विकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदासाठी जितेंद्र हरिश्चंद्र ठाकूर यांचे नाव अधिकृतरित्या जाहीर होताच शहरभर उत्साहाचे आणि…
परिवर्तनाच्या लाटेत सहभागी होत जनताच खेचणार डॉ. शिंदेच्या विजयाचा रथ. पारोळा तालुक्यातील बहादरपुर येथील बद्रीनारायणाच्या रथोत्सवात महाविकास आघाडीचे डॉ. अनिल…