पारोळा येथील आघाडीचे उमेदवार सतीश पाटिल व अमळनेर विधानसभा चे उमेदवार डॉ अनिल शिंदे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादीचे अध्यक्ष मा शरद पवार यांची प्रचार सभा संपन्न.

सविस्तर वृत्त असे की, राज्यातील विधानसभेची रणधुमाळी सुरू झाल्याने सर्वत्र जाहीर सभा घेण्याची लगभग सुरू झाली आहे.खान्देशातील आघाडीचे पारोळ व अमळनेर च्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा श्री शरद पवार यांची जाहीर सभा पारोळा येथील एनइएस हायस्कुल च्या प्रांगणात संपन्न झाली.यावेळी उपस्थित समुदायाला संबोधित करतांना
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा शरद पवार…
यांनी उपस्थित समुदयाला संबोधित करतांना सांगितले की, या युती सरकारने राज्यातील महिलांची अवस्था भयावह करून ठेवली आहे.राज्यात वर्ष भरात जवळपास ९ हजार महिला बेपत्ता झाल्या आहेत. बदलापूर मधील अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार सारख्या निंदनीय घटना राज्यात सर्वत्र रोज घडत आहेत व युती सरकार हातावर हात धरून बसले आहेत.तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली राज्यघटना दुरुस्ती च्या नावाने बदलण्याचा डाव मोदी च्या केंद्राच्या सरकारे रचला होता.मात्र देश एक संघ राहण्यामागे घटना महत्वाची असल्याने इंडिया आघाडीने एकजूट होऊन घटना बदलण्याचा डाव हाणून पाडला,जवळपास 900 शेतकरयांनीं आत्महत्या केल्या आहेत त्याला कारण म्हणजे शेतमालाला योग्य किमंत मिळाला नाही.इतकी वाईट गोष्ट कोणतीही असू शकत नाही.राज्यात सावकारी फोफावली आहे,मी केंद्रीय कृषिमंत्री असतांना 70 हजार कर्ज माफ केले,आजचे सरकार काहीही करायला मागत नाही,तरुणांना नोकऱ्या नाहीत म्हणून तरुणां मध्ये नैराश्य येत आहे.या नतभ्रष्ट सरकारला सत्ते पासून दूर ठेवण्यासाठी डॉ सतीश पाटील व डॉ अनिल शिंदे यांना जनता निवडून देतील याचा मला खात्री आहे.राज्यात बदल हवा आहे.तुमची साथ मिळाली तरच शक्य आहे.जनतेत पोहचा,चुका दुरुस्त करून पुढे चला.
राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक कराडे सर….
यांनी प्रचाराथ भाषणात शरद पवार यांच्या संदर्भात बोलतांना ते म्हणाले की तरुणांना लाजवेल असे तारुण्य ८४ वय असलेल्या शरद पवार यांच्यात दिसून येत आहे.या वयात त्यांचा पक्ष फोडतांना किंबहुना चोरतानां लाज वाटत नाही ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.साल्यानीं, इलेक्ट्रॉल बाँड घोटाळा सारखे अनेक घोटाळे केले,शेतकऱ्यांबाबत बोलतांना मायां बापाच्या सोयाबीनला भाव नाही दिला,माय बहीन सुरक्षित नाही.म्हणून हे जातीयवादी निष्क्रिय सरकारला घरी पाठवण्यासाठी आघाडी चे उमेदवार डॉ अनिल शिंदे व डॉ सतीश पाटील यांना विजयी करा,असे आवाहन केले.
याप्रसंगी कॉंग्रेस च्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी गिरीश महाजन यांना आसमान दाखवणार असल्याचे सांगितले.महायुतीला मतांची कडकी आहे म्हणून बहिण लाडकी झालीअसे सांगुन पुढे ते म्हणाल्या जो फुले शाहू आंबेडकर की बात करेगा,वही हम पर राज करेगा.
शिवसेनेचे नेते करन पवार यांनी मनोगतात सांगितले की,जिल्ह्यातील सर्व उबाठा शिवसेनेचे पदाधिकारी एकजुटीने आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी अथक प्रयत्न करणार व निवडून आणनारच, जनतेनी लोकसभेची निवडणूक हातात घेतली होती व आघाडी लां यश दिले आताही तेच होणार आहे.
सतीश पाटील यांनी मतदारांना भावनिक आवाहन करतांना बोलले की, माझ्या निष्ठतेचे फलित म्हणून मला शरद पवारांनी उमेदवारी दिली,मी निवडून येऊन शरद पवार साहेब यांच्या वाढदिवसाला भेट देणार,तालुक्यात सर्वत्र पाणी पोहचवले,या सरकारने कापूस उत्पादक शेतकरी यांच्या पाठीत खंजिर खुपसला,त्यांनी 22 लाख कापसाच्या गाठी ऑस्ट्रेलिया मधून आणल्याने शेतकरी हवालदिल आहे,पारोळ येथील विद्यमान आमदार कधीच बांधावर गेला नाही त्यामुळे त्याना शेतकऱ्यांची व्यथा समजणार नाही,पिण्याचा पाण्याची सोय केली नाही,सुशोभीकरण केले ते फक्त खिसा भरण्यासाठीच,मा शरद पवार साहेबांनी नारपार – नदी जोड साठी सहकार्य करावे,उपस्थित मतदारांना भावनिक आवाहनात ते बोलले की ही माझी शेवट ची निवडणूक आहे म्हणून निवडून द्यावे.
या प्रसंगी राष्ट्रवादी चे ज्येष्ठ नेते अरुण भाई गुजराथी, राष्ट्रवादी प्रमोद पाटील, या सहा अनेकांनी आपले मनोगत मांडले.
प्रचार सभेच्या मंचावर जिल्ह्यातील आघाडीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते तर सभे साठी बहू संख्येने मतदार उपस्थित होते.
