अमळनेर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल नोव्हेंबर महिन्यापासून वाजण्यास सुरुवात होणार आहे. जानेवारी अखेरपर्यंत सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण होऊन लोकप्रतिनिधींचे राज्य सुरू होईल.
नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका-नगरपंचायत, त्यानंतर जिल्हा परिषद आणि त्यानंतर महापालिकेच्या निवडणुका होतील. दर वीस दिवसांनी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे निवडणूक लढवू इच्छिणाऱ्यां च्या तयारीला दिवाळीनंतर वेग येईल असे मानले जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारी अखेरपर्यंत घ्या, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या दृष्टीने आयोगाने तयारी सुरू केली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी गटांच्या आरक्षणाची सोडत सोमवारी काढण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत देखील काढण्यात आली. नगरपालिका-नगरपंचायती साठीच्या निवडणुकीची देखील तयारी केली जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राजकीय पक्षांनी देखील काम सुरू केले आहे.
अमळनेर दिनांक 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या महाराष्ट्र सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी अमळनेर नगर परिषदेतर्फे सर्व सफाई कामगार, कार्यालयीन अधिकारी व…