अमळनेर येथील ग्रामीण पाणी पुरवठा उपविभागाचे उपविभागीय अधिकारी दिलीप दत्तात्रय पाटील यांनी लाच मागितल्याने भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, १९८८ चे कलम ०७ प्रमाणे लाचलूचपत विभागाने केली कारवाई.अमळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल.
सविस्तर वृत्त की,खाजगी ठेकेदार यांनी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत मौजे व मजरे हिंगोणे, ता. चोपडा येथे सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३,५५,००० /- रुपयांचे काम पुर्ण केले होते .दि.१३.१०.२०२५ रोजी तक्रारदार हे जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग अमळनेर कार्यालयात गेले असता श्री. दिलीप पाटील, उपविभागीय अधिकारी यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाचे ३,५५,००० /- रुपयांचे काम पुर्ण केल्याचा अहवाल बनवुन दिल्याचे मोबदल्यात एकुण बिलाच्या २ टक्के, (७००० रूपये) लागतील असे बोलुन ठेकेदार यांचे कडुन लाचेची मागणी केली होती परंतु तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक १५.१०.२०२५ रोजी ला. प्र. वि. जळगांव पथकाकडे लेखी तक्रार दिली होती.त्याप्रमाणे दिनांक १५.१०.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता दिलीप पाटील यांनी तक्रारदार यांचे कडे बिलाच्या २ टक्के, (७००० रूपये) लाचेची मागणी करून तडजोडीअंती ४,००० /- रूपये लाचेची स्विकारण्यास सहमती दर्शविली.
त्याप्रमाणे दिलीप पाटील यांनी ठेकेदार यांचेकडुन ४,००० /- रू. लाच रक्कम स्वत:ता स्वीकारली म्हणुन दिलीप पाटील यांचेविरूध्द अमळनेर पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला.
