प्रभाग यादीतून इच्छुक उमेदवाराचे नाव यादीतून वेगळल्याने तक्रार दाखल..

   अमळनेर येथील नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी करण्यास इच्छुक उमेदवाराच्या कुटुंबांचे नावे वगळण्यात आल्याने अमळनेर मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे कडे तक्रार दाखल करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला आले उधान.

     सविस्तर वृत्त की, शहरातील सिद्धार्थ चौक,गांधलीपुरा डॉ. आंबेडकर बोर्डा जवळ राहणारे सोमचंद छगन संदानशिव हें तेथील रहिवासी असून त्यांनी येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत प्रभाग क्रं 4 मध्ये अनुसूचित जाती साठी राखीव जागेवर आपल्या धर्मपत्नी यांना रिंगणात उतरविण्याचे जाहीर केले आहे .मात्र अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या प्रभाग निहाय मतदार याद्या बनविण्याचे काम त्या त्या वार्डातील कर्मचाऱ्याकडे दिलेले होते. परंतु सदर कामी आदेशात नमूद कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त इतर न पा कर्मचाऱ्यांनी बेकायदेशीर रीत्या प्रभाग क्र.४ च्या यादीच्या कामकाजात हस्तक्षेप करून माझे व माझ्या पूर्ण परिवाराचे नाव प्रभाग क्र.४ मधून प्रभाग क्र.५ मध्ये टाकून माझी नावे प्रभाग ४ मधून वगळल्याची तक्रार करीत संबंधित कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करून त्या कालावधीतील सी.सी.टी व्ही फुटेज मिळणे कामी सोमचंद संदानशिव यांनी मुख्याधिकारी तथा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमळनेर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ यांचे कडे तक्रार दाखल केल्याने शहरात उलट सुलट चर्चेला उधान आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!