जवखेडा श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालय येथे माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए. पी. जे.अब्दुलजी कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस संपन्न….
अमळनेर येथील जवखेडा श्री गुरुदेव दत्त सार्वजनिक वाचनालय येथे माजी राष्ट्रपती कै. डॉ. ए. पी. जे.अब्दुलजी कलाम साहेब यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिवस संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नूतन मराठा संस्थेचे बी बी ठाकरे हायस्कूल अंतर्गत श्रीराम नथु रवंदळे भाग शाळा, जवखेडे येथील उपशिक्षक श्री. निरंजन पेंढारे सर हे अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद मराठी शाळेतील शिक्षीका व अमळ्नेर खान्देश साहित्य संघाच्या अध्यक्षा सौ. सुनीता पाटील मॅडम व सौ.रत्नप्रभा साळुंखे मॅडम हया उपस्थित होत्या.
कार्यक्रमात विद्यार्थ्यां साठी भव्य असे पुस्तक प्रदर्शन ठेवण्यात आले होते, त्याचा लाभ उपस्थित विद्यार्थी व विदयार्थिनींनी यांनी विविध पुस्तकांचे वाचन करून घेतला.
शासनाने घोषित केल्यानुसार भारताचे दिवंगत माजी राष्ट्राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांचा जन्म दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून ग्रंथालय तर्फे साजरा करण्यात आला. कार्यक्रमात कवयित्री सुनिता पाटील यांनी विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून कवितेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात श्री. पेंडरे सर यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारा मूलमंत्र उदाहरणासह देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेवटी आपल्या भाषणातून दरवर्षी आपल्या गावातील या वाचनालयात विविध कार्यक्रम यशस्वीरित्या घेतले जातात तर येथे उपलब्ध असलेल्या मुबलक वाचन साहित्याचा तसेच वर्तमान पेपर व नियतकालिके याचा लाभ सर्व गावकरी घेतात ही बाब विशेष असल्याचे नमूद करून यातून नक्की सक्षम व यशस्वी पिढी निर्माण होईल असा विश्वास व्यक्त केला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या संचालक मंडळाने व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
मुंबई,राज्यातील सर्व अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला शासनाने तूर्त स्थगिती दिली आहे. याबद्दल शिक्षण संचालक यांनी संचमान्यता, समायोजन आणि पगार…
अमळनेर प्रतिनिधी,अर्थशास्त्र विभाग आणि रुसा यांच्या संयुक्त विद्यमाने अर्थशास्त्र विषयातील रोजगारांच्या संधी या विषयावर प्रताप महाविद्यालयात दि 21 सप्टेंबर 2024…