अमळनेर : सोन्यात सलग आज शुक्रवारी १६ व्या दिवशी तेजी होती. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या अहवालानुसार, २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत आज १७ ऑक्टोबर रोजी ३,४०३ रुपयांनी वाढून १,३०,८७४ रुपयांच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली. काल ती १,२७,४७१ रुपयांवर होती.

