अमळनेर येथील विजयनाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचे वरिष्ठ लिपिक प्रेमराज सूर्यवंशी यांची सुकन्या वैष्णवी प्रेमराज सूर्यवंशी हिने महाराष्ट्र शासनाच्या भूमी अभिलेख (नाशिक विभाग) परीक्षेत देदीप्यमान यश मिळवून ‘भू-करमापक’ (Land Surveyor) अधिकारी पदाला गवसणी घातली आहे. या यशाबद्दल नवलभाऊ शैक्षणिक परिवारातर्फे वैष्णवी व तिच्या पालकांचा विशेष सत्कार करण्यात आला.

जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश
वैष्णवीने सरळ सेवा परीक्षेच्या माध्यमातून कठोर परिश्रम घेऊन हे यश संपादन केले आहे. एका सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने आपल्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासाच्या जोरावर अधिकारी पदापर्यंत घेतलेली ही गगनभरारी इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.
मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार सोहळा
नवलभाऊ प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभाप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. यात प्रामुख्याने:
प्रा. सुनील गरुड (मानद शिक्षण संचालक, नवलभाऊ प्रतिष्ठान)
प्रा. शाम पवार व डी. बी. पाटील (प्रशासकीय अधिकारी)
डि. के. पवार (निवृत्त प्राचार्य)
उमेश काटे (कार्यकारी सदस्य, राज्य सैनिकी शाळा असोसिएशन)
प्रा. डॉ. हुकूमचंद जाधव
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय उभाळे होते. यावेळी प्रा. डॉ. यु. वाय. गांगुर्डे, प्रा. डॉ. एन. झेड. पाटील, डॉ. एस. जे. पाटील, प्रा डॉ सुजाता निकम, प्रा डॉ ए बी सोनवणे, प्रा शिवाजी सूर्यवंशी, प्रा विजय शिंदे, प्रा एस के कदम,प्रा. डॉ. के. डी. बागुल, रविंद्र धनगर, संभाजी पाटील, रोहिदास पाटील, संजय पवार, संतोष पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्थाचालकांकडून कौतुकाचा वर्षाव
वैष्णवीच्या या यशाबद्दल नवलभाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, संस्थेच्या मार्गदर्शिका शिलाताई पाटील, कार्याध्यक्ष अनिकेत पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रियदर्शनी पाटील तसेच एल. डी. पाटील व बी. टी. पाटील यांनी तिचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
