अमळनेर मराठी वाड्मय मंडळ व सावित्रीबाई फुले ज्येष्ठ महिला मंडळाच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. १५ मार्च रोजी नांदेडकर हॉलमध्ये जागतिक महिला दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ज्येष्ठ महिलांचे घरातील स्थान, आरोग्य आणि संस्कारांची शिदोरी यावर मान्यवरांनी प्रकाश टाकला.

