अमळनेर शिवसेना शहर कार्यकारिणीची बैठक उत्साहात; संघटन मजबुतीवर भर ​“गाव तिथे शाखा, प्रभाग तिथे शाखा” उपक्रमाद्वारे शिवसैनिकांना बळ देणार – माजी आमदार शिरीषदादा चौधरी

अमळनेर येथील शिवसेना शहर कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली. आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्यासाठी “गाव तिथे शाखा आणि प्रभाग तिथे शाखा” हा उपक्रम राबवून प्रत्येक शिवसैनिकाला ताकद देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार

बैठकीच्या प्रारंभी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला. यामध्ये नवनियुक्त तालुकाप्रमुख गुलाब पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रथमेश पवार, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, शहरप्रमुख भरत पवार आणि विलास कंखरे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यकारिणी विस्तारावर चर्चा

यावेळी शहर कार्यकारिणी विस्तारासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. जुन्या पदाधिकाऱ्यांचा योग्य सन्मान राखून नव्या उत्साही कार्यकर्त्यांना सामावून घेतले जाईल आणि लवकरच अधिकृत कार्यकारिणी घोषित करण्यात येईल, असे संकेत देण्यात आले. शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वामुळे अमळनेरमधील शिवसेनेला नवी उभारी मिळाल्याची भावना अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केली.

​अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहा – शिरीषदादा चौधरी

मार्गदर्शन करताना शिरीषदादा चौधरी म्हणाले की, “शिवसैनिकांनी अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहावे आणि गोरगरिबांच्या मदतीला तत्परतेने धावून जावे. लोकसंपर्क वाढवून सदस्य नोंदणीवर भर द्यावा. भविष्यात जे शिवसैनिक क्रियाशील राहतील, त्यांना संघटनात्मक पदांच्या माध्यमातून मोठी जबाबदारी दिली जाईल.”

यावेळी तालुकाप्रमुख गुलाब पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुरेश पाटील, नगरसेवक महेश देशमुख व दादा पवार यांनीही उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करत संघटन मंत्र दिला.

मान्यवरांची उपस्थिती

या बैठकीला नगर परिषदेचे गटनेते पंकज चौधरी, गटनेते महेश देशमुख, नगरसेवक दादा पवार, अबू महाजन, श्रीराम चौधरी, मोहन सातपुते, कैलास पाटील, नाविद शेख, दिपक चौगुले, ज्ञानेश्वर धनगर, तसेच बाळु पाटील, बाळासाहेब संदानशिव, ॲड. सुरेश सोनवणे, पंकज भाई, नाना धनगर, अवि जाधव, विजेंद्र शिरसाळे, संतोष पाटील, चंद्रकांत कंखरे, गुलाम नबी, कमलेश चौधरी, पंकज भावसार, राजा शेख, प्रमोद शिंपी, अमन, सनी चव्हाण, शंतनु भावसार यांच्यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!