अमळनेरात आयएमए तर्फे स्व.डॉ.मोमिता देबनाथ हत्येचा केला निषेध

 

अमळनेर प्रतिनिधी, येथील आयएमए या संघटने तर्फे स्व.डॉ.मोमिता देबनाथ बलात्कार व हत्येप्रकरणी दिले निवेदन…

सविस्तर वृत्त असे की,पच्छिम बंगालमधील कोलकत्ता येथील S.R.KAR HOSPITAL च्या डॉक्टर मोमिता देबनाथ या स्वत:ची डयुटी संपवून रात्री आराम करत असतांना त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करुन नंतर हत्या करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद संपुर्ण देशात उमटले.या घटनेचां निषेध अमळनेर तालुक्यातील डॉक्टर्स यांच्या आयएमए संघटनेने प्रांतधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन देऊनती तीव्र निषेध केला. या निवेदनात प्रकरणातील सर्व आरोपींना लवकरात लवकर पकड़ून त्यांना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली. तसेच डॉक्टरांना हॉस्पीटल मध्ये काम करतांना कुठलीही भिती वाटली नाही पाहिजे या पद्धतीचे कठोर कायदे शासनाने आणावेत व देशातील सर्वच डॉक्टर महिलांच्या सुरक्षे संदर्भातील उपाय योजना कठोर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली.

यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉ अविनाश जोशी, डॉ अनिल शिंदे,डॉ संदिप जोशी, डॉ किरण बडगुजर, डॉ शरद बावीस्कर,डॉ प्रकाश ताडे,डॉ आधार बोरसे,डॉ योगेश नेतकर सह अनेक डॉक्टर सह पथॉलोजी चालक मालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!