म्हैस आडवी आल्याने दुचाकी स्वार जखमी तर महिलेचा जागीच मृत्यू…

अमळनेर येथील अमळनेर – जळगाव महामार्गवर चांदणी कुऱ्हे गावा जवळील रेल्वे गेट जवळील सती देवीच्या मंदिरात दर्शन घेऊन परतत असताना शहराजवळील बुलढाणा अर्बन वेअर हाऊस समोर अमळनेर येथील आर के नगर मधील रहिवासी मधुकर ठाकरे हे आपली पत्नी मंगल यांच्या सोबत दुचाकीवर येत असताना रस्त्यात अचानक मोकाट असलेली म्हैस आडवी आल्याने दुचाकीचा अपघात होऊन महिलेला डोक्याला मार लागल्याने जागीच ठार झाल्याचे कळतं तर मधुकर ठाकरे यांना जबरदस्त मार लागल्याने पुढील उपचारासाठी खाजगी दवाखाण्यात दाखल करण्यात आले असल्याची माहिती मिळते.

सदर कुटुंब हे परिसरात मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. सदरची घटना वाऱ्या सारखी पसरल्याने ग्रामीण रुग्णालयात गर्दी लोटली होती.

न पा प्रशासनाने मोकाट फिरणाऱ्या जणांवराचा त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!