जळगांव : भारतीय बाजारात सोन्या आणि चांदीची दरवाढ आता एका नवीन उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे.
भारतातील सोन्या-चांदीच्या किमती वाढतच असून दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि कमकुवत डॉलरमुळे गुंतवणूकदार सराफा बाजाराकडे वळले आहेत.
मजबूत मागणी, व्याजदर कपातीची अपेक्षा आणि भू-राजकीय अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर मंगळवारी, ३० सप्टेंबर रोजी नवीन विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. सणासुदीच्या काळात सोन्याच्या किमतींनी नवे विक्रम केले आहेत. भारतात सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १,१६,५४० रुपयांवर पोहोचले आहेत.
भारतीय वायदा बाजारात सोन्याचे ऑक्टोबर ऑक्टोबर फ्युचर्स मंगळवारी सकाळी ९.३० वाजता १२५२ रुपयांनी वाढून प्रति १० ग्रॅम १,१६,७०० रुपयांवर उसळले आहेत.
इंडिया बुलियनच्या माहितीनुसार देशांतर्गत बाजाराच्या सुरुवातीला सोन्याचा भाव १,१६,४१० रुपयांवर उघडला ज्यात सोमवारच्या १,१४,९४०च्या बंदवारू १,४७० रुपयांची वाढ झाली. त्यानंतर अजूनही सोन्याच्या दरांमध्ये वाढीचा कल पाहायला मिळत आहे. सोन्याच्या दरवाढीचा मागोवा घेत चांदीनेदेखील उसळी घेतली आणि पूर्णे वर चांदीचा वायदा भाव ०.५ टक्के वाढून १,४३,८४० रुपये प्रति किलो झाला. याशिवाय दिवसभरात सोन्या-चांदीच्या दरांमध्ये चढ-उतार राहण्याची शक्यता आहे.
