पारोळा येथील अवैध धंद्यांवर वचक ठेवत सतत प्रभावी कारवाया करणाऱ्या पारोळा पोलिसांच्या धाडसी कामगिरीचा गौरव म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि कविता नेतकर यांच्या हस्ते पोलिसांचा सन्मान करण्यात आला.
तालुक्यातील वाढते गुन्हेगारीच्या मुसक्या आवळण्यात पारोळा पोलीस सदैव प्रयत्नशील असल्याने अलीकडेच पारोळा पोलिसांनी बोरी नदीकाठी सुरू असलेल्या अवैध देशी दारू अड्ड्यावर गुप्त माहितीनुसार छापा टाकला. या कारवाईत उपविभागीय अधिकारी (पोलीस) विनायक कोते,पोलीस निरीक्षक सचिन सानप, उपनिरीक्षक अमोल दुकळे, सुनील हटकर, डॉ. शरद पाटील, महेश पाटील, प्रविण पाटील आणि अनिल राठोड यांनी सहभाग घेतला.या कारवाईत तब्बल 38 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपींना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले.
दुसऱ्या मोठ्या कारवाईत पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शरद पाटील, मिथुन पाटील, आकाश पाटील, आणि संजय पाटील यांच्या पथकाने म्हसवे शिवारातील राजस्थान ढाब्याजवळील परिसरात अफूची बोंडे असलेली शेतीचा छडा लावून त्यावर कारवाई करून तब्ब्ल 50 लाख 82 हजार 992 रुपये किमतीची अफू व इतर साहित्य हस्तगत केले.आरोपींना अटक करण्यात येऊन पुढील तपास सुरू आहे.
या दोन्ही उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पारोळा पोलिसांचे कौतुक करत पारोळा पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान केला. या प्रसंगी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर सह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
अमळनेर,उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दैनिक लोकमत वृत्तपत्रामार्फत…
चोपडा / पुणे: “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत, एका अत्यंत गंभीर व गुंतागुंतीच्या गुन्ह्यात आरोपीला जन्मठेपेपर्यंत पोहोचवणाऱ्या चोपडा ग्रामीण…