जळगाव — जिल्हा प्रशासन निवडणूक विभागा तर्फे राष्ट्रीय सोळावा मतदार दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला यंदाची (थीम )घोष माझा भारत माझा देश ,मी आहे भारत हे होत.
लोकसभा, विधानसभा तसेच स्थानीय स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जिल्हा प्रशासन निवडणूक विभागातर्फे सामाजिक कार्यातील अग्रेसर व्यक्तिमत्व मुकुंद गोसावी यांना डिस्ट्रिक्ट आयकॉन म्हणून निवड करण्यात आलेली असल्याने मुकुंद गोसावी हे निरपेक्षपणाने जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचून मतदान जनजागृती करत असतात. याकामाची दखल जिल्हा प्रशासनातर्फे घेऊन विशेष सन्मान सोळाव्या राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय नियोजन भवन येथे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी श्री. रोहनजी घुगे (भाप्रसे) यांच्या शुभ हस्ते,अप्पर जिल्हाधिकारी डॉ. श्रीमंत हारकर ,अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्यासह मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत करण्यात आला.
एरंडोल येथील रहिवासी व वावडदा तालुका जळगाव येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी(महावितरण) कार्यालयात वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत असणारे दिनेश…
अमळनेर,उत्तर महाराष्ट्रातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक, आरोग्य व राजकीय कार्य करणाऱ्या कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने दैनिक लोकमत वृत्तपत्रामार्फत…