महाराष्ट्र राज्य पत्रकार संघा तर्फे पत्रकार दिनाला विविध क्षेत्रांतील ‘रत्नांचा’ होणार गौरव….

    अमळनेर शहर प्रतिनिधी, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ (मुंबई), शाखा अमळनेरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्ह्याचा नावलौकिक वाढवणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दि. ६ जानेवारी ‘पत्रकार दिन’ निमित्त भव्य सांस्कृतिक सोहळ्यात मान्यवरांना सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत.

   यावर्षीच्या पुरस्कारांमध्ये पत्रकारीता, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील दिग्गजांचा समावेश आहे.

प्रमुख पुरस्कारार्थी आणि विभाग.

 माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील (अमळनेर भूषण )

ओमप्रकाश मुंदडा (अमळनेर भूषण )

माजी केंद्रीय मंत्री ऍड विजय नवल पाटील (शिक्षण महर्षी)

मा. भिकन पाटील (‘शिक्षण महर्षी)

मा. शिवाजीराव पाटील (‘साहित्य रत्न’ पुरस्कार)

डॉ. जी. एम. पाटील (आरोग्य देवदूत)

डॉ. प्रशांत शिंदे (आदर्श आरोग्य सेवा दूत)

मंगळग्रह देव मंदिर देवस्थानला ( ‘आदर्श देवस्थान’)

सौ. रिता बाविस्कर (आदर्श सामाजिक कार्यकर्ता)

किरण उर्फ कृष्णा बहारे (समाज भूषण )

मा. प्रविण पाटील आणि ज्ञानेश्वर धनगर यांना सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार दिले जातील.

उद्योग व व्यवसाय: कैलास पाटील (उद्योगरत्न)

तर प्रेमकुमार सासनाणी,प्रीतेश पारख, जितेंद्र गुंजाळ, रोनक संकलेचा (युवा उद्योजक) म्हणून गौरवण्यात येणार.

पारस गोल्ड यांना (‘आदर्श सुवर्णकार’ पुरस्कार)

नितीन पाटील(आदर्श सरपंच),

विक्की जाधव (युवा उद्योजक),

डिगांबर वाघ (उत्कृष्ट अभियंता),

महेश पाटील (आदर्श लोक सेवक),

अनिता सुरडकर (आदर्श शिक्षिका),

पत्रकारिता पत्रकारितेतील प्रदीर्घ सेवेबद्दल नानासो पांडुरंग पाटील यांना ‘जीवन गौरव’

 मा. एकनाथ सोनवणे (उत्कृष्ट वृत्तपत्र वितरण),

सिद्धांत सिसोदे (आदर्श पोलीस),

अजय शिवरामे (आदर्श कर्मचारी)

वाहतूक पोलीस विभागाला (उत्कृष्ट सेवा),

गोविंद गायकवाड (उत्कृष्ट गायक),

रवींद्र भोई (उत्कृष्ट कलाकार) पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

    सदर पुरस्कार हे समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींच्या कामाची दखल घेऊन समाजाला प्रेरणा मिळावी व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून दिले जात असल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अमळनेर तालुकाध्यक्ष डॉ.समाधान मैराळे यांनी सोमवारी जाहिर केले. दरम्यान निवडीबद्दल पुरस्कारार्थींवर सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!