अमळनेर : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे.या योजनेचे २१ हप्ते आतापर्यंत वितरीत करण्यात आले आहे. यायोजनेत वार्षिक ६ हजार रुपयांचा लाभ देण्यात येतो. दोन हजार रुपयांचे तीन हप्ते थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येतात.सध्या काही राज्यात केंद्राच्या या योजनेप्रमाणेच शेतकऱ्यांसाठी थेट लाभ योजना राबविण्यात येत आहे.पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता नवीन वर्षात शेतकऱ्यांना मिळेल. पण त्यापूर्वी केंद्र सरकारने एक अट घातलीआहे. त्यानुसार, शेतकऱ्यांना फार्मर आयडी जोडल्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही.

