नंदुरबार प्रतिनिधी(फहीम शेख) येथील जिल्ह्यातील लघुसिंचन विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करून अनेक ठिकाणी साठवण बंधारे बांधले गेले असताना साठवण बंधाऱ्यात एक थेंब पाणी देखील शिल्लक नाही. तर दुसऱ्या ठिकाणी बोगस व निकृष्ट बंधाऱ्याच्या बांधकाम करून फक्त निधी लाटण्याच्या काम संबंधित अभियंते आणि ठेकेदार करीत असल्याची शेतकऱयांची भावना आहे.

काही दिवसापूर्वीच बांधलेल्या भोणे येथे साठवण बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाच्या करण्यात आल्याची स्थानिक शेतकरी करीत आहे . शेतकऱ्यांनी सदर साठवण बंधाऱ्याची तक्रार करताच संबंधित ठेकेदाराने थातूरमातूर बंधाऱ्याची दुरुस्ती करून सदर कामावर पडदा टाकण्याच्या प्रकार केला आहे.
तसेच वरुळ गावा येथे एक नव्हे तर तब्बल पाच-सहा बंधारे बांधण्यात आले आहे. परंतु काही बंधाऱ्यात एक थेंब देखील पाणी शिल्लक नाही. फक्त संबंधित अभियंते आणि ठेकेदार शासनाच्या निधीची अक्षरशः लय लूट करीत आहे.
जिल्हा प्रशासनकडे भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून सुद्धा चौकशी का करत नाही असा सवाल देखील शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ जिल्ह्यातील सर्व साठवण बंधाऱ्यात किती पाणी शिल्लक आहे व बांधलेल्या बंधारे यांच्या कामांची चौकशी जिल्हा प्रशासन करतील का,असा सवाल देखील शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
