गावराणी जागल्याच्या प्रयत्नाने वांदा समितीने घेतले शेतकरी हिताचे निर्णय… गावराणी जागल्याने मानले जाहीर आभार

अमळनेर येथील गावरानी जागल्या सेना कार्यकारणी सदस्य श्री रमेश व्यंकट पाटील रा. गडखांब यांनी दिनांक २७ मे २०२३ रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीत दिलेल्या तक्रार अर्जातील मागणीबाबत सहाय्यक निबंधक, अमळनेर यांनी दिनांक ०४ जुलै २०२४ रोजी आदेश पारित केलेला होता. पारित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सततच्या पाठपुराव्यामुळे दिनांक ०५ मार्च २०२५ रोजी वांधा समितीच्या सदस्या सह गावरानी जागल्या सेना संघटना अध्यक्ष व तक्रारदार शेतकरी , बाजार समिती सचिव व सहसचिव यांची एकत्रित बैठक घेण्यात आली.

हे झाले निर्णय….

१) प्लेट काट्यावरील तोलाईची रक्कम शेतकऱ्यां कडून घेतली जाणार नाही

२) शेतमालाच्या लिलावांती शेतमाल ओला आहे,शेतमालात माती व काडी कचरा आहे,असे दर्शवून शेतमालाच्या मोजणीवेळी शेतमालास देण्यात आलेला भाव कमी करणे किंवा शेतमालाच्या वजनाच्या कपाती बाबत ( कट्टी बाबत ) शेतकर्यास सुचित करणे अशा कोणत्याही बेकायदेशीर कार्यपद्धतीचा अवलंब न करता शेतमालास लिलावा प्रसंगी दिलेल्या दराने शेतकऱ्यांचा सर्व शेतमाल खरेदीदार व्यापारीस मोजणे बंधनकारक राहील.

३) त्याचप्रमाणे लिलावांती शेतमाल खरेदीदार व्यापार्यांच्या गोडाऊन पर्यंत पोहोच करून देणेची शेतकऱ्यांना सक्ती केली जाणार नसून शेतमाल
खरेदीदार व्यापाऱ्याच्या गोडाऊनपर्यंत पोहोच करून देणेस शेतकरी संमत आहे असे शेतकऱ्याचे संमतीपत्र घ्यावे.

४) श्री रमेश व्यंकट पाटील या तक्रारदार शेतकऱ्याच्या तक्रार अर्जातील मागणीप्रमाणे प्रति क्विंटल रुपये ४०/- प्रमाणेचा शेतमाल व्यापारीच्या गोडाऊनपर्यंत पोहोच करून देणेचा वाहतूक खर्च, प्लेट काटा तोलाईची भरलेली रक्कम रूपये ५०-तसेच वराईपोटी कपात केलेली रुपये १२७ /- अशी सर्व रक्कम देेण्याबाबत निर्णय पारित करण्यात आला.

बाजार समितीच्या वांदा समितीकडून शेतकरी हितार्थ घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने वांधा समितीचे तसेच सर्व संचालक मंडळाचे त्याचप्रमाणे शेतमाल खरेदीदार व्यापारीआडतदारांचेसहाय्यक निबंधकांचे गावरानी जागल्या सेनेच्या स्तरावरून आभार व्यक्त करण्यात आले.

 

गावराणी जागल्याचे शेतकऱ्यांना आवाहन….

शासन स्तरावरून जाहीर करण्यात आलेला किमान आधारभूत दर शेतकर्यांच्या शेतमालास मिळावा या हेतूने शेतकरी बंधू-भगिनीनी त्यांच्या शेतमालाचा नियमान्वयेचा F. A. Q./ Non F., A. Q. मूल्यांकनाचा अहवाल बाजार समितीतील उपलब्ध प्रयोगशाळेतील प्रतवारीकारा कडून प्राप्त करून घ्यावा. तसेच शेतक-्यांनी शेतमाल मोजण्याआधी त्यांच्यावरील अन्यायाची बाब कुषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील उपलब्ध सचिव, सहसचिव, उपसचिव यांच्या निदर्शनास आणून द्यावी . शेतकऱ्यां वरील अन्यायाबाबतच्या तक्रारीचे निवारण २४ तासाच्या आत करण्यात येईल, ही बाब देखील वांदा समितीने व सचिवांनी निदर्शनास आणून दिलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!