अमळनेर:महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान देणारे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांची जयंती शासनाच्या निर्णयानुसार २२ जुलै रोजी शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर, स्व. अजितदादांच्या स्मृती आणि विचार सदैव जपले जावेत, या भावनेतून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, अमळनेरच्या वतीने तालुक्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये व महाविद्यालयांना स्व. दादांच्या प्रतिमेच्या फोटो फ्रेम भेट देण्याचा स्तुत्य व भावूक उपक्रम राबवण्यात आला.

