अमळनेर:क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे औचित्य साधून अमळनेर शहरात ‘एक दौड संविधान की और’ या संकल्पनेवर आधारित भव्य मॅरेथॉन स्पर्धा-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. ‘धावूया आरोग्यासाठी, धावूया समतेसाठी’ असा संदेश देत होणारी ही स्पर्धा रविवार, दिनांक १२ एप्रिल २०२६ रोजी पार पडणार आहे.


