अंमळनेर : पर्यावरणाचा होणारा ऱ्हास रोखण्यासाठी आणि निसर्गाचे देणे फेडण्यासाठी अंमळनेर येथील अंबऋषी टेकडी बहुउद्देशीय पर्यावरण ट्रस्टतर्फे एक स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे. येत्या शुक्रवार, दिनांक ०३/०७/२०२६ रोजी वड सावित्री पौर्णिमेचे औचित्य साधून टेकडीवर वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहिमेत सर्व अंमळनेरकरांनी आपल्या अर्धांगिनीसोबत सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

