अमळनेर :जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर अशक्य गोष्टही शक्य करता येते, हे अमळनेर तालुक्यातील वाघोदे येथील चैताली रामकृष्ण पाटील या तरुणीने सिद्ध करून दाखवले आहे. चैतालीची मुंबई पोलीस दलात निवड झाली असून, नागपूर येथील खडतर प्रशिक्षण पूर्ण करून ती प्रथमच गावी परतली असता, वाघोदे ग्रामस्थांनी तिची सवाद्य भव्य मिरवणूक काढून तिचे जल्लोषात स्वागत केले.

