लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने प्रसंगावधान राखत वाचवले एकाचे प्राण
अमळनेर प्रतिनिधी, येथील रेल्वे स्थानकात झाडी गावाच्या इसमाचा ट्रेन खाली जीव जात असताना एका पत्रकाराने प्रसंगावधान राखत वाचवले त्याचे प्राण.

अमळनेर रेल्वे स्थानकावर दि. ८ रोजी दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास सुरतच्या दिशेने जाणारी गांधी धाम एक्सप्रेस प्लॅटफॉर्म क्र.१ वर येत असताना सुरतला जाण्यासाठी निघालेला प्रवाशी विकास अभिमन्यू पाटील राहणार, झाडी हे जागा मिळवण्यासाठी धावपळ करत प्लॅटफॉर्म वरून गाडीत चढत असताना अचानक त्यांचा तोल गेल्याने ते गाडीच्या चाकाखाली आले. यावेळी प्लॅटफॉर्मवर पत्रकार रजनीकांत पाटील हे उभे होते त्यांनी जिवाची पर्वा न करता अत्यंत धाडसाने त्या तरुणाचा हात धरून त्याला वर खेचले. यावेळी चाकाखाली आल्याने त्यांच्या दोन्ही पायाच्या पंजाचा चंदामेंदा झालयाचे दिसून आले दरम्यान काही कर्मचाऱ्यांच्या मदतीने उचलून त्यांना पलटावर ठेवले व तातडीने आरपीएफ व जीआरपीएफ यांना संपर्क साधला असता घटनास्थळी पोलीस कर्मचारी व रेल्वे कर्मचारी यांनी त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविले व तेथून त्यांना पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले. घटनेचा पुढील तपास लोहमार्ग पो.ना दिनकर कोळी करीत आहे.
प्रसंगावधान राखून स्वताच्या जीवाची पर्वा न करता पत्रकार रजनीकांत पाटील दाखविलेले धाडसाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्या वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
