अमळनेर : अक्षय कृषी परिवार आणि श्री मंगळग्रह सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘भूमी सुपोषण अभियान’ या राष्ट्रीय चळवळीच्या महिनाभर चाललेल्या जनजागर मोहिमेचा सांगता सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ (अक्षय्य तृतीया) रोजी सकाळी ८:०० वाजता श्री मंगळग्रह मंदिरात संपन्न होणार आहे. अत्यंत भव्य-दिव्य आणि चैतन्यमय वातावरणात होणाऱ्या या सोहळ्यास तालुक्यातील शेतकरी व विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

महिनाभराचा ऐतिहासिक प्रवास
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंहजी चौहान यांच्या हस्ते १९ मार्च रोजी या अभियानाचा राष्ट्रीय स्तरावर प्रारंभ झाला होता. गुढीपाडव्यापासून अमळनेर तालुक्यातील १५६ गावांमध्ये जनजागर रथाच्या माध्यमातून हे अभियान राबवण्यात आले. दररोज गावागावांत जाऊन रथाद्वारे शेतकऱ्यांना जमिनीचे आरोग्य, भूमी सुपोषणाचे महत्त्व आणि रासायनिक खतांच्या दुष्परिणामांविषयी मार्गदर्शन करण्यात आले. या अभियानास उद्या एक महिना पूर्ण होत असून, अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या मासिक मोहिमेची सांगता होणार आहे.
कृषी अधिकारी व तज्ज्ञांचे लाभणार मार्गदर्शन
सांगता सोहळ्याप्रसंगी महाराष्ट्रातील कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी भूमी सुपोषण अभियानाचा उद्देश, व्याप्ती आणि भविष्यात होणारे सकारात्मक परिणाम यावर सविस्तर ऊहापोह केला जाईल. शेती आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी भूमी मातेचे आरोग्य जपणे किती गरजेचे आहे, याचे प्रबोधन यावेळी केले जाणार आहे.
शेतकऱ्यांसाठी विशेष आवाहन: ‘एक मूठ माती’ अन् संकल्पाची साथ
