“गांधली ग्रामपंचायतीचा ऐतिहासिक पुढाकार; ‘व्हर्लपूल’ कंपनीत ग्रामीण भागातील २५ तरुणांना मिळाली कायमस्वरूपी नोकरी!”……सरपंच व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे प्रदान

     अमळनेर : ​गांधली परिसरातील स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी गांधली ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. ‘व्हर्लपूल इंडिया’ या जागतिक कीर्तीच्या कंपनीच्या माध्यमातून गांधली येथे भव्य कामगार मेळावा उत्साहात पार पडला. या मेळाव्यातून परिसरातील तब्बल २५ कुशल आणि अकुशल युवकांची निवड करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन

निवड झालेल्या उमेदवारांना सरपंच नरेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य राहुल बाविस्कर, प्रवीण आप्पा पाटील, अनिल पाटील, संजय पाटील, शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी पी चौधरी व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी बोलताना मान्यवरांनी युवकांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुबंई चे खान्देश उपाध्यक्ष प्रा. डॉ. विजय गाढे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कंपनी व ग्रामपंचायतीचे आभार मानले.

तज्ज्ञांकडून थेट मुलाखती

या मेळाव्यासाठी व्हर्लपूल इंडियाचे ह्युमन रिसोर्स मॅनेजर शरद काकडे आणि प्रोडक्शन मॅनेजर कैलास दळवी यांनी उपस्थित राहून उमेदवारांच्या थेट मुलाखती घेतल्या. १०वी, १२वी, ITI, डिप्लोमा आणि पदवीधर अशा विविध स्तरावरील २५ मुलांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आली आहे.

मिळणारे लाभ आणि सुविधा

वेतन श्रेणी: पात्रता आणि कॅटेगरीनुसार १६,००० ते ३०,००० रुपयांपर्यंत मासिक पगार.

इतर लाभ: PF, ESIC आणि कॅन्टीन सुविधा.

विशेष सुरक्षा: महिला कामगारांसाठी स्वतंत्र बस सेवा.

​      या मेळाव्याचे आयोजन ग्रामपंचायत गांधली आणि ग्रामविकास विचार मंच यांच्या वतीने करण्यात आले होते. सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामविकास अधिकारी यांनी या रोजगार मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले. ग्रामीण भागातील तरुणांना थेट जागतिक कंपनीत संधी उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!