अमळनेर: आजच्या संगणक, मोबाईल आणि इंटरनेटच्या युगात जग जरी जवळ आले असले, तरी मुलांमध्ये संस्कारांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. विभक्त कुटुंब पद्धती आणि पालकांच्या व्यस्त जीवनशैलीमुळे मुलांच्या जडणघडणीसाठी वेळ देणे कठीण झाले आहे. अशा परिस्थितीमध्ये मुलांमध्ये नैतिक मूल्ये, देशभक्ती, शिस्त व संस्कार रुजवण्याच्या उद्देशाने अमळनेर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘बाल संस्कार शिबिराला’ बालचमूंसह पालकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.

गीता परिवाराच्या प्रेरणेने आणि सौ. उर्मिला जगदीश अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर ११ मे ते १५ मे २०२६ या कालावधीत उत्साहात पार पडले. लिनेस क्लब ऑफ अमळनेर व गीता परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

