अमळनेरचे युवासैनिक मुंबईकडे रवाना; ‘महायुवोत्सवा’साठी मोठा उत्साह!…… आमदार शिरीषदादा चौधरींच्या नेतृत्वाखाली युवाशक्ती सज्ज; उद्या मुंबईत घुमणार शिवसैनिकांचा आवाज

अमळनेर :मुंबई येथे आयोजित भव्य “महायुवोत्सव” मेळाव्यासाठी अमळनेर मतदारसंघातील तमाम युवासैनिक मोठ्या संख्येने सज्ज झाले आहेत. शिवसेना-युवासेना प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली शनिवार, दि. १८ एप्रिल २०२६ रोजी हा मेळावा पार पडणार असून, यासाठी अमळनेरमधून शिवसैनिकांचा मोठा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे.

‘चलो मुंबई’चा नारा आणि युवाशक्तीचा जल्लोष

आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली अमळनेर तालुक्यातील युवासैनिकांनी ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. या मेळाव्यासाठी स्थानिक स्तरावर प्रचंड तयारी करण्यात आली असून, कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. “युवाशक्तीचा जल्लोष, एकतेचा नारा आणि शिवसैनिकांचा दमदार आवाज आता मुंबईत घुमणार,” अशा निर्धाराने तरुण कार्यकर्ते मुंबईकडे प्रस्थान करत आहेत.

प्रमुख नेत्यांचे लाभणार मार्गदर्शन

मुंबईतील या मेळाव्यात शिवसेना आणि युवासेनेचे वरिष्ठ नेते राज्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. आगामी राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी युवाशक्तीला संघटित करणे आणि त्यांना मार्गदर्शन करणे हा या ‘महायुवोत्सवा’चा मुख्य उद्देश आहे.

अमळनेरमध्ये उत्साहाचे वातावरण

अमळनेर येथील बस स्थानक आणि रेल्वे स्थानक परिसरात सकाळी कार्यकर्त्यांनी भगवे झेंडे फडकवत आणि घोषणाबाजी करत वातावरण शिवमय केले होते. आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजित पद्धतीने हा प्रवास सुरू असून, अमळनेरची युवाशक्ती मुंबईत आपला प्रभाव दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

या मेळाव्यामुळे युवासेनेच्या बळकटीला मोठी चालना मिळणार असून, संपूर्ण राज्याचे लक्ष या महायुवोत्सवाकडे लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!