अमळनेर :येथील बसस्थानकाजवळील पाचपावली मंदिर परिसरात सुरू असलेल्या एका इमारतीच्या बांधकामाच्या ठिकाणी गुरुवारी सकाळी एक भीषण अपघात घडला. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने एका ३५ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे. गणेश छगन राठोड असे या दुर्दैवी मजुराचे नाव असून, तो पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा येथील रहिवासी होता.

