आज अमळनेरात मुस्लीम खाटीक समाजाचा पहिला ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळा….. उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद देण्याचे आयोजकांकडून आवाहन

    अमळनेर : येथे अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाज यांच्यावतीने समाजातील आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना आधार देण्याच्या उद्देशाने अमळनेर मध्ये पहिल्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

     हा भव्य आणि सामाजिक बांधिलकी जपणारा विवाह सोहळा आज गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथे पार पडणार असून, यात सुमारे २० जोडपी विवाहबंधनात अडकणार आहेत.

     या ऐतिहासिक सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मंत्री मा.गुलाबराव पाटील, माजी मंत्री व आमदार अनिल भाईदास पाटील, खासदार स्मिता वाघ, माजी आमदार साहेबराव पाटील, खाटीक समाज चे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी,. माजी आमदार फारुक शाह, नगराध्यक्ष डॉ परिक्षित बाविस्कर, जळगांव चे एजाज मलिक,करीम सालार,फारुक शेख, तसेच विविध प्रशासकीय अधिकारी,यांच्यासह राज्यातील विविध ठिकाणचे मान्यवर अर्थात लोकप्रतिनिधी, प्रशासकीय अधिकारी व समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित राहून नवदाम्पत्यांना शुभेच्छा व आशीर्वाद देणार आहेत.

सोहळ्याचे वैशिष्ट्य…

      हा सामूहिक विवाह सोहळा समाजातील ऐक्य, सलोखा व सामाजिक उत्तरदायित्वाचे प्रतीक ठरणार असून, विवाहाचा वाढता खर्च कमी करून समाजातील तरुण-तरुणींना सन्मानाने विवाह करण्याची संधी देण्याचा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. 

      समाजातील सर्व घटकांनी या उपक्रमास सहकार्य केल्याबद्दल आयोजकांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच या सोहळ्यास सर्व समाजातील नागरिकांनी उपस्थित राहून नवदाम्पत्यांना आशीर्वाद द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

      हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अखिल महाराष्ट्र मुस्लीम खाटीक समाज पंच कमिटी, अमळनेर व इज्तेमाई शादी कमिटी परिश्रम घेत असून त्यात नगरसेवक मुख्तार खाटीक (अध्यक्ष), यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य सक्रिय सहभाग घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!