अमळनेर: भुसावळ येथे ‘कॅशिअस स्पोर्ट्स अकॅडमी’ तर्फे आयोजित ‘मिशन ऑलिम्पिक बॉक्सिंग डेव्हलपमेंट’ स्पर्धेत अमळनेरच्या खेळाडूंनी आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करत पदकांची लयलूट केली. जिल्ह्याचे बॉक्सिंगचे केंद्र समजल्या जाणाऱ्या भुसावळमध्ये अमळनेरच्या ‘B.BOYS अकॅडमी’ च्या सात विद्यार्थ्यांनी पदके जिंकून शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
या स्पर्धेत हर्षदीप बाळकृष्ण जाधव याने ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक (Gold Medal) पटकावले. तर खालील खेळाडूंनी रौप्य पदक (Silver Medal) मिळवून घवघवीत यश संपादन केले:
आदित्य योगेश ठाकूर (३० किलो गट)
आदिन्य दीपक संदानशिव (३५ किलो गट)
यश दीपक संदानशिव (३७ किलो गट)
सार्थक संजय अहिरे (२७ किलो गट)
निल दीपक संदानशिव (२५ किलो गट)
उदय अमित मिस्त्री (६० किलो गट)
या सर्व विजयी खेळाडूंना प्रशिक्षक भूपेंद्र शिरसाठ यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या यशामुळे अमळनेरच्या क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून खेळाडूंचे आणि त्यांच्या प्रशिक्षकांचे अभिनंदन होत आहे.
अमळनेर तालुक्यातील संत सखाराम महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या विद्याथ्याने पुन्हा एकदा आपले कर्तृत्व सिद्ध करत अमळनेरचा झेंडा उंचावला आहे.…