अमळनेर न पा उर्दू शाळा क्र. ७ मध्ये मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे; कराटे मास्टर सुनील करंदीकर यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती

      अमळनेर येथील नगर परिषद प्राथमिक उर्दू शाळा क्रमांक ०७ मध्ये ‘समग्र शिक्षा’ अभियानांतर्गत सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता ६ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींसाठी ‘राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा प्रशिक्षण’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विशेष मोहिमेसाठी अमळनेरचे ख्यातनाम कराटे मास्टर सुनील करंदीकर यांची मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, दि. २५ मार्च २०२६ पासून प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे.

विविध मार्शल आर्ट्सचे मिळणार प्रशिक्षण

या उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींना केवळ शारीरिक शिक्षणच नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी विविध प्रकारच्या युद्धकलांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने:

योगा आणि सैनिकी प्रशिक्षण

​ज्युडो-कराटे, वुशू आणि किकबॉक्सिंग

​मुय थाई, जिउजित्सू आणि काव मागा

आयकिडो, जी कुनेदो आणि भारतीय मार्शल आर्ट्स

मुलींच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल

       आजच्या काळात मुलींना स्वतःचे संरक्षण करता यावे, त्यांचे मनोबल उंचावे आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण व्हावा, या उद्देशाने शासनाच्या परिपत्रकातील नियमांनुसार हे प्रशिक्षण राबवले जात आहे. प्रशिक्षक सुनील करंदीकर आणि त्यांची टीम विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाची विशेष कौशल्ये शिकवणार आहेत.

या उपक्रमाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक आणि व्यवस्थापन समितीने समाधान व्यक्त केले असून, विद्यार्थिनींमध्येही या प्रशिक्षणाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या यशस्वी नियोजनाबद्दल सुनील करंदीकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!