आरटीइ साठी चुकीची माहिती दिली असल्यास गुन्हा दाखल करणार – शिक्षणाधिकारी विकास पाटील

जळगाव आरटीई म्हणजेच मोफत शिक्षणासाठी प्रवेश घेताना विद्यार्थीच्या पालकानी खोटी व चुकीची माहिती चुकीचा पत्ता सादर करून,जेथे प्रत्यक्षात राहत नाहीत त्याठिकाणाचा पत्ता सादर करून प्रवेश घेण्याचा प्रयत्न केल्यास आणि कागदपत्र पड़ताळणीत,पत्त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी दिल्यानतर तालुकास्तरीय निवड समितीच्या अशी बाब निदर्शनास आल्यास तो प्रवेश रद्द करण्यात येईल व पालकाविरुूद्ध फौजदारी कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्राथमिक शिक्षणाथिकारी विकास पाटील यानी दिली आहे.


वंचित व दुरबल घटकातील अर्ज केलेल्या बालकांसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के राखीव जागांवर निवड झालेल्या बालकांच्या नावाची निवड यादी १४ रोजी शासनामार्फत प्रसिद्ध झालेली आहे.निवड झालेल्या बालकाच्या आई अथवा वडिलाच्या पालकाचे त्यानी अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल क्रमांकावर तसे मेसेज देण्यात आलेले आहेत. ऑनलाइन लॉटरी प्रक्रियेद्वारे या बालकाची निवड झालेली आहे. पालकानी दिलेला अर्जातील पत्ता, गुगल पत्ता, लोकेशन, जातप्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आणि भाडेकरार बाबीची कागदपत्र तसेच आवश्यकतेनुसार प्रत्यक्ष रहिवासाच्या ठिकाणी भेट देऊन पड़ताळणी केली जाणार आहे.२५ टक्के प्रवेश प्रक्रियेतील लॉटरी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीन राज्यस्तरावरून राबविण्यात येत असल्याने पालकाना त्यांच्या बालकाच्या प्रवेशाबाबत कोणतेही प्रलोभन कोणीही दिलेले असल्यास त्यास बळी नपडण्याचे आवाहन शिक्षणाथिकारी प्राथमिक यानी केले आहे.तसेच जे योग्य व खरी कागदपत्रे आहेत तीच
तालुकास्तरीय निवड समितीकडे सादर करावीत, कोणतीही चुकीची कागदपत्रे सादर करू नयेत किवा तालुकास्तरीय निवड समितीची दिशाभूल करु नये, असे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!