अमळनेर :”छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, त्यामागे राजमाता जिजाऊंचे संस्कार होते. आजच्या आधुनिक युगातही महिलांनी स्वतः जिजाऊ बनणे गरजेचे आहे, तरच प्रत्येक घरात संस्कारक्षम ‘शिवबा’ घडतील. आजच्या शिवबांच्या हातात लॅपटॉप आणि मोबाईल ही आधुनिक शस्त्रे देतानाच, त्याचा योग्य वापर आणि महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार देणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन प्रसिद्ध सिनेतारक अलका कुबल यांनी केले.

